बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (17:28 IST)

परमबीर सिंग निलंबित होणार !

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या संदर्भात  गृहविभाग आदेश जाहीर करतील अशीही माहिती समोर येतेय. परमबीर सिंग यांच्यावर पाच वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल असून त्यांचा तपास सुरू आहे.

परमबीर सिंग यांनी २०० दिवसांहून अधिक दिवस गृह विभागाला न कळवता परस्पर सुट्टी घेतली होती. त्या संदर्भातही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मिळतेय. आता निलंबन करण्यात आलंय याच्या पुढची कारवाई थेट सेवेतून बडतर्फ असणार आहे. परमबीर सिंग हे अचानक गायब झाले आणि अखेर २३४ दिवसांनी ते मुंबईत परतले. मुंबईत परतले परमबीर सिंग हे ड्युटीवर अद्यापही हजर नाहीत आणि असे असतानाही ते सरकारी गाडीचाच वापर करत आहेत. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता त्यांनी यावर चौकशीचे आदेश दिल्याचं म्हटलं आहे.

वळसे पाटील यांनी म्हटलं, परमबीर सिंग यांनी आपला पदभार स्वीकारलेला नाहीये. ज्या प्रकारे ते गाडीचा वापर करत आहेत ते चुकीचं आहे. ते कामावर नाहीत त्यांच्याबर गंभीर आरोप आहेत. तरीदेखील ते गाडी वापरत आहेत. सरकारी यंत्रणांचा वापर त्यांनी केला नाही पाहिजे. हे चुकीचं आहे चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी अद्याप आपला पदभार स्वीकारलेला नाही.