शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

खादी-ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर गांधींऐवजी मोदी

खादी-ग्रामोद्योगच्या डायरी आणि कॅलेंडरवर महात्मा गांधी यांच्या फोटोऐवजी पंतप्रधान मोदी यांचे फोटो वापरण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खादी, चरखा आणि स्वदेशी यांचे महात्मा गांधी यांच्याशी अतूट असे नाते आहे. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्याकडून चरखादेखील हायजॅक करण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे.

देशात संघाच्या विचारधारेचे सरकार आले आहे ज्यांनी महात्मा गांधीजींच्या विचारांना समाप्त करण्याचे कटकारस्थान नेहमीच केले आहे. आता ते गांधींच्या जागी स्वतःचे फोटो लावत आहेत. ही गोष्ट देशाच्या भवितव्यासाठी फार भयंकर असून आम्ही या गोष्टीचा तीव्र शब्दात विरोध करतो आणि येणाऱ्या काळात ही गोष्ट आम्ही जनतेपर्यंत नेण्याचे काम करू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.