बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 15 डिसेंबर 2021 (23:49 IST)

ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचे निधन ,भोपाळ मध्ये होणार अंत्यसंस्कार

सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह तामिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात गंभीर जखमी झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचे निधन झाले. त्यांचा 40 दिवसांचा जीवन संघर्ष संपला. वरुण हा फायटर असल्याचे त्यांच्या वडिलांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. तो जिंकून बाहेर येईल. पण तसे झाले नाही. वरुण सिंग जीवनाची लढाई हरले. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी 10 वाजता भोपाळ येथे आणण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर भोपाळमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.  
वरुणचे वडील सेवानिवृत्त कर्नल केपी सिंग हे एअरपोर्ट रोडवरील सन सिटी कॉलनीत राहतात. ते सध्या बंगळुरूमध्ये असून, तिथे कॅप्टन वरुण सिंगवर उपचार सुरू होते. यानंतरही बुधवारी सकाळी वरुणच्या मृत्यूची बातमी आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. सनसिटी कॉलनीतील शेजारी त्याच्या घराबाहेर जमले होते. कर्नलचे शेजारी दलजीत सिंग यांनी सांगितले की, भोपाळमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. भोपाळचे जिल्हाधिकारी अविनाश लावनिया यांनी याला दुजोरा दिला आहे. शहीद ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचे पार्थिव लष्कराच्या विमानाने गुरुवारी भोपाळला येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 17 डिसेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. याआधी ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे उत्तर प्रदेशातील देवरियाचे रहिवासी असल्याची बातमी आली होती. त्यामुळे देवरियातही अंतिम संस्कार होऊ शकतं.