गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 11 एप्रिल 2022 (09:54 IST)

Gujarat:भरुचमध्ये केमिकल कंपनीत स्फोट, 5 कर्मचारी जळाले, एक बेपत्ता

Gujarat Bharuch Blast: गुजरातच्या भरुचमध्ये एका केमिकल कंपनीत मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये कंपनीतील 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर कंपनीतील एक कर्मचारी बेपत्ता असून, त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी गुन्हा  दाखल करून अपघाताच्या कारणाचा शोध सुरू केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, भरूचच्या दहेज येथील ओम ऑरगॅनिक केमिकल कंपनीत रविवारी रात्री उशिरा हा स्फोट झाला. हा अपघात एवढा भीषण होता की कंपनीत काम करणाऱ्या 5 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला  स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर एक कर्मचारी बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत असून, त्याचा आजूबाजूला शोध सुरू आहे.