मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 16 डिसेंबर 2023 (10:56 IST)

हृदयद्रावक! पैशासाठी मुलाने केली आईची हत्या, आरोपी मुलाला अटक

murder
आई आणि मुलाचं नातं जगात सर्वात वेगळं आहे. देव प्रत्येकाकडे जाऊ शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली. पण हरियाणातील हिसारच्या हांसी येथे एका नराधम मुलाने आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. या मुलाने काही पैशांसाठी आपल्या जन्मदात्या आईला संपविले.

सदर घटना  13 डिसेंबर रोजी हरियाणाच्या हिसारमधील हांसी येथील विकास नगरमध्ये घडली आहे. या मुलाने आईची गळा आवळून हत्या केली. हिमांशू असे या आरोपी मुलाचे नाव आहे. 
बिहारच्या गोपालगंज येथील आयआयटीचा विद्यार्थी हिमांशू हिसारमध्ये त्याची आई प्रतिमा देवीसोबत राहत होता. .
 
आईची गळा आवळून हत्या केल्यानंतर आरोपी मुलगा मृतदेह घेऊनहिमांशूने आई प्रतिमा यांच्याकडे काही कामासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. त्याच्या आईने त्याला पाच हजार रुपये देण्यास नकार दिल्याने त्याने गळा आवळून खून केला. एवढेच नाही तर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने आईचा मृतदेह घरी ठेवलेल्या निळ्या सुटकेसमध्ये पॅक केला. त्यानंतर ऑटोमध्ये बसून तो हिस्सार रेल्वे स्थानकावर आला. येथून तो हिसार रेल्वे स्थानकावरून आपल्या आईचा मृतदेह एका सुटकेसमध्ये घेऊन गाझियाबादला गेला. गाझियाबादहून त्यांनी पुन्हा ट्रेन बदलली आणि  प्रयागराजला पोहोचला.
 
प्रयागराज रेल्वे स्थानकावरून तो ई-रिक्षाने संगमच्या ठिकाणी पोहोचला तेव्हा हिमांशूच्या हातात एक मोठी सुटकेस दिसल्याने तेथे गस्त घालणाऱ्या पोलिसांना संशय आला.
 
या संशयाच्या आधारे पोलिसांनी त्याला अडवले असता तो सुटकेस सोडून घटनास्थळावरून पळू लागला आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. तपासादरम्यान त्यांनी सुटकेस उघडल्याने पोलिसांना देखील धक्का बसला. हिमांशू या सुटकेसमध्ये आईच्या मृतदेहाचे संगमात विसर्जन करण्यासाठी पोहोचला होता. पोलिसांनी तात्काळ हिमांशूला अटक करून त्याची आई प्रतिमा देवी यांचा मृतदेह फॉरेन्सिक तपासणीनंतर पोस्टमॉर्टमसाठी सामान्य रुग्णालयाच्या शवागारात पाठवला. पोलिसांनी पकडल्यानंतर हिमांशूने सांगितले की तो आयआयटीचा विद्यार्थी आहे. 
 
तो मूळचा बिहारमधील गोपालगंज येथील रहिवासी आहे. त्याचे वडील ओमप्रकाश सिंह हे बिहारमधील मोतिहारी येथे एका  दुकानात काम करतात. त्याच्या आईचे त्याच्या वडिलांशी मतभेद होते, त्यामुळे ती मुलगा आणि मुलीसह हिस्सारमध्ये राहू लागली . हिमांशूच्या बहिणीचे म्हणजेच प्रतिमाच्या मुलीचे लग्न हिसारमध्ये झाले आहे. सध्या या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून हिमांशूला न्यायालयात हजर केले असून तेथून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit