शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (13:03 IST)

राजस्थानमध्ये भीषण अपघात, बस टँकरला धडकली; यात 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला

राजस्थानच्या बाडमेर-जोधपूर महामार्गावर बुधवारी एका खासगी बसने टँकरच्या ट्रेलरला धडक दिल्याने लागलेल्या आगीत पाच जण जिवंत जळाले. हा टँकर उलट्या दिशेने वेगाने येत होता. हा अपघात इतका भयंकर होता की, त्यात बस जळून खाक झाली आणि 12 लोकांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. हा अपघात राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील पाचपदराजवळ प्रवासी बस आणि टँकरच्या ट्रेलर मध्ये धडक होऊन झाला.  
अपघात होण्यापूर्वी बसमध्ये 25 जण होते. अपघातानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. गंभीररित्या जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जिल्हाधिकार्‍यांना मदत आणि बचाव कार्याबाबत निर्देश दिले आणि जखमींवर उपचाराची खात्री करण्यास सांगितले.