मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (23:47 IST)

रागाच्या भरात येऊन मुलाने वडिलांची हत्या करून मृतदेहाचे ३२ तुकडे केले, आरोपी मुलाला अटक

murder
दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडानंतर आता कर्नाटकातही असेच प्रकरण समोर आले आहे. राज्यातील बागलकोटमध्ये एका व्यक्तीने आपल्या वडिलांची हत्या करून मृतदेहाचे 32 तुकडे केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने हे तुकडे उघड्या बोअरवेलमध्ये फेकले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अर्थ मूव्हर्सच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेतला. विठ्ठला कुलाली असे आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ६ डिसेंबरची आहे. आरोपीचे वय सुमारे 20 वर्षे आहे. रागाच्या भरात त्याने त्याचे वडील परशुराम कुलाली (५३) यांची लोखंडी रॉडने हत्या केली. दारूच्या नशेत परशुराम शिवीगाळ करायचा. त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा वेगळे राहतात. गेल्या आठवड्यात मंगळवारीही मद्यधुंद अवस्थेत वडिलांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्यावर आरोपीने रागाच्या भरात लोखंडी रॉडने वडिलांची हत्या केल्याचे सांगितले जात आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हत्येनंतर आरोपींनी वडिलांच्या मृतदेहाचे 32 तुकडे केले. त्यानंतर त्याने बागलकोट जिल्ह्यातील मुधोल या शहराच्या बाहेरील मंतूर बायपासजवळील त्याच्या शेतातील एका उघड्या बोअरवेलमध्ये शरीराचे अवयव फेकून दिले.
 
Edited by - Priya Dixit