आयपीएस सोनाली मिश्रा आरपीएफच्या पहिल्या महिला डीजीपी बनल्या
First Woman RPF DGP :वरिष्ठ आयपीएस अधिकारी सोनाली मिश्रा यांची रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मिश्रा या 1993 च्या बॅचच्या मध्य प्रदेश कॅडरच्या भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत.
कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मिश्रा यांच्या नियुक्तीला 31 ऑक्टोबर 2026 रोजी निवृत्त होईपर्यंत मान्यता दिली आहे. त्या 31जुलै रोजी निवृत्त होणाऱ्या विद्यमान महासंचालक मनोज यादव यांच्याकडून पदभार स्वीकारतील.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मिश्रा आरपीएफचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी असतील. इतर कर्तव्यांव्यतिरिक्त, आरपीएफ रेल्वे मालमत्तेची आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घेते.
सोनाली मिश्रा सध्या मध्य प्रदेश पोलिसात अतिरिक्त महासंचालक (निवड) आहेत. त्या जबलपूरमध्ये डीआयजी होत्या आणि पोलिस मुख्यालयात आयजी इंटेलिजेंस म्हणूनही काम केले आहे. त्यांनी बीएसएफ मुख्यालय, दिल्ली आणि काश्मीर खोऱ्यातही काम केले आहे. जालंधर येथील सीमा सुरक्षा दल (BSF) पंजाब फ्रंटियरमध्ये त्या आयजी म्हणून तैनात आहेत. त्या गुप्तचर विभागाच्या आयजी देखील राहिल्या आहेत.
Edited By - Priya Dixit