अवकाश केंद्रातून रिमोट सेंसिंग उपग्रह रिसोर्ससॅट-2ए चं यशस्वी प्रक्षेपण
भारताची वनसंपदा आणि जलसंसाधने, खनिजांची माहिती घेणे या करीता आपल्या देशाने अवकाशात भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) एक यशस्वी पाऊल उचलले आहे. इस्रोने सतीश धवन अवकाश केंद्रातून रिमोट सेंसिंग उपग्रह रिसोर्ससॅट-2ए चं यशस्वी प्रक्षेपण केल आहे. पीएसएलव्ही-सी36च्या मदतीने इस्रोने उपग्रह अंतराळात सोडला आहे . हा रिसोर्ससॅट-1 आणि 2 च्या सिरीजमधला उपग्रह आहे. हा 1.235 किलो वजनाचा उपग्रह जमीनीतील साधनांची माहिती देणार आहे. इस्रो तर्फे जगातील अनेक देशांचे उपग्रह अवकाशात सोडले जातात. तर दुसरी कडे आपणा मागील १८ वर्षाचा विचार केला तर पीएसएलव्हीच्या माध्यमातून 36 यशस्वी प्रक्षेपणांतून 121 उपग्रह अंतराळात सोडण्यात भारत यशस्वी झाला आहे. यापैकी 79 उपग्रह परदेशी होते, तर 42 सॅटेलाईट हे आपले आहेत.त्यामुळे जगातील सर्वात मोठा अवकाश संशोधक देश म्हणून जगात आपली ओळख निर्माण झाली आहे.