1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 9 ऑक्टोबर 2022 (11:47 IST)

जोधपूर: गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट, चार जागीच ठार

राजस्थानमधील जोधपूर शहरात गॅस रिफिलिंग दरम्यान सिलेंडरचा स्फोट झाला. या अपघातात तीन मुलांसह चौघांचा मृत्यू झाला. सर्व एकाच कुटुंबातील आहेत. तर 16 जण गंभीर जखमी आहेत. स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूच्या वसाहतीतील लोकही हादरले. 
 
सदर घटना तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यानंतर कीर्ती नगर परिसरात गॅस गळती झाली. काही वेळातच स्फोट झाला. जवळच असलेल्या कॉलनीत उभी असलेली वाहनेही आगीच्या भक्ष्यस्थानी आली. 
 
ज्या घरात रिफिलिंग होत होते ते घर कोजाराम लोहार यांचे असल्याचे तपासात उघड झाले. कोजाराम यांचा मुलगा गॅस रिफिलिंगचे काम करतो. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे सध्या समजू शकलेले नाही. रिफिलिंग दरम्यान हा स्फोट झाल्याचा संशय आहे. 

तपासात घरातून सुमारे चार डझन घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरही काढण्यात आले आहेत. हे घर लोकांच्या घरी सिलेंडर घेऊन जाणाऱ्या फेरीवाल्याचं असल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात घराचा काही भागही कोसळला.मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. जखमींवर उपचारासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 

Edited By- Priya Dixit