बाप्परे, ४ पाय व २ लिंग असलेले मुल
कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यातील पुलादिनी गावातील एका महिलेने ४ पाय व २ लिंग असलेल्या मूलाला जन्म दिला आहे. सध्या बाळ व बाळंतीण सुखरूप असून, डॉक्टर बाळाच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत. चेन्नाबास्वा (२६) व ललितम्मा (२३) असे जोडप्याचे नाव आहे. या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे या मुलावर महागडे उपचार करणे शक्य नव्हते. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नाने सदर बाळास बेल्लारीच्या 'विजयनगरम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस'मधील (व्हीआयएमएस) अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.दुसरीकडे, 'व्हीआयएमएस'चे डॉक्टर दिवाकर गड्डी यांनी हे प्रकरण आमच्यासाठी आव्हानदायक असल्याचे स्पष्ट केले आहे.