शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (14:43 IST)

मोठा अपघात: सैन्यदलाचे हेलिकॉप्टर जम्मू-काश्मिरात कोसळले ,दोघे जखमी

जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ  शिवगडच्या डोंगरावर जंगलात मंगळवारी सकाळी लष्कराच्या हेलिकॉप्टरचे क्रॅश लँडिंग झाले आहे.या अपघातात एक जवान शहीद झाल्याची माहिती आहे,तर दोन क्रू मेंबर गंभीर जखमी झाले आहेत.एका वैमानिकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. 
 
जम्मू -काश्मीर पोलिसांच्या मते, हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला आणि संपूर्ण परिसरात धूर पसरला. या अपघातात वैमानिक आणि सह-वैमानिक दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.घटनास्थळी पोलिसांचे पथक पाठवण्यात आले आहे.तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशमनदलाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.
 
अपघातग्रस्त हेलिकॉप्टर लष्कराचे असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचे कारण परिसरात मुसळधार पाऊस आणि धुके असल्याचे सांगितले जात आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे.या घटनेत दोन वैमानिक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
सूत्रांच्या माहितीनुसार, जखमी वैमानिकांपैकी एकाला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान,घटनास्थळी पोहोचलेली लष्कराची टीम हेलिकॉप्टरचा ढिगारा एकत्र करण्यात लागली आहे. हे हेलिकॉप्टर कोसळले की आपत्कालीन लँडिंग केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
हेलिकॉप्टर कोसळताच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले.त्यांनी जखमी पायलट आणि सह-पायलटला हेलिकॉप्टरमधून बाहेर काढले.दरम्यान,लष्कर बचाव दल आणि पोलिसही घटनास्थळी पोहोचले.दोन्ही जखमींना उधमपूर कमांड रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.