मुकुल रॉय पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये, भाजपाला रामराम

Last Modified शुक्रवार, 11 जून 2021 (17:10 IST)
पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते मुकुल रॉय ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्षाच्या (TMC) कार्यालयात पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा शुभ्रांशुनेसुद्धा तृणमूलमध्ये प्रवेश केला.
मुकुल रॉय हे एकेकाळी टीएमसीच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत जवळचे मानले जात. मात्र, त्यानंतर ते भारतीय जनता पक्षात गेले.
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विस्तार करण्यात मुकुल रॉय यांचा मोठा हातभार आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर मुकुल रॉय भाजपमध्ये नाराज असल्याचे वृत्त समोर येत होतेच.
मुकुल रॉय आणि त्यांची पत्नी कोरोनाबाधित झाले होते आणि या काळात भाजपच्या मंडळींनी त्यांची विचारपूसही केली नव्हती. त्यानंतर ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी मुकुल रॉय यांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून मुकुल रॉय यांच्याशी चर्चा केली.
बुधवारी (9 जून) तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते सौगत रॉय यांनी मुकुल रॉय यांच्या घरवापसीचे संकेत दिले होते.
सौगत रॉय म्हणाले होते, "मुकुल रॉय तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले असतील, पण त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात काहीच म्हटलं नाहीय."
मुकुल रॉय यांनी 2017 साली तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

त्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तर अनेक नेत्यांनी पक्षांतर करत भाजपला जवळ केलं होतं. विधानसभा निवडणुकीआधी ज्यांनी तृणमूलला राम राम केलं होतं, त्यांना भाजपमध्ये घेण्यात मुकुल रॉय यांची भूमिका महत्त्वाची होती, असं म्हटलं जातं.यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

12वी चा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणार

12वी चा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणार
सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य मंडळांना दहावीच्या आत बारावीच्या परीक्षेचे अंतरिम ...

भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये परतण्यासाठी प्रायश्चित, 200 ...

भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये परतण्यासाठी प्रायश्चित, 200 कार्यकर्त्यांचं मुंडण
पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश ...

नरेंद्र मोदी काश्मिरच्या गुपकार नेत्यांना भेटणार, या 4 ...

नरेंद्र मोदी काश्मिरच्या गुपकार नेत्यांना भेटणार, या 4 मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित
रियाझ मसरुर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (24 जून) काश्मीरच्या नेत्यांबरोबर एक ...

'मुख्यमंत्री गप्प राहून किती महिलांवर बलात्कार होताना ...

'मुख्यमंत्री गप्प राहून किती महिलांवर बलात्कार होताना पाहणार आहेत?'-स्मृती इराणी
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात वाद ...

राम मंदिरांच्या नावाने फेक वेबसाईट बनवून लोकांची फसवणूक ...

राम मंदिरांच्या नावाने फेक वेबसाईट बनवून लोकांची फसवणूक करण्यात आली आहे
लाखो राम भक्तांकडून पैसे उकळल्याची धक्कादायक बातमी नोएडातून