मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 26 डिसेंबर 2021 (17:13 IST)

नराधमी बापानेच मतीमंद मुलीवर केला बलात्कार, मुलगी गरोदर असल्यामुळे उघडकीस आले

पोलिसांनी एका मतिमंद मुलीच्या वडिलांना बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे. पीडित मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे पीजीआयमध्ये तपासणीनंतर उघड झाले. पोलिसांनी गर्भाचा डीएनए आरोपीच्या डीएनएशी जुळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.हा धक्कादायक प्रकार हरियाणाच्या रोहतक येथे घडला आहे. 
पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले, तेथून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर मुलीला महिला आश्रमात पाठवण्यात आले आहे.  सांपला पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, एक व्यक्ती मोलमजुरीचे काम करते आणि आपल्या कुटुंबासह सदर आरोपी  पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात राहतात. त्याने तक्रार केली की त्याच्या पत्नीचे निधन झाले आहे, तर मुलगा घर सोडून गेला आहे. घरात एक 30 वर्षांची मतिमंद मुलगी आहे.
 तब्येत बिघडल्याने मुलीला घेऊन पीजीआयमध्ये, जिथे मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी कायदेशीर सल्ल्यानंतर मुलीचा गर्भपात केला. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
 
पोलिसांना या घटनेचा कोणताही सुगावा न लागल्याने मुलीच्या वडिलांवरच  संशय आला. त्याचा देखील तपासात समावेश करण्यात आला. यानंतर मुलगी, मुलीचे वडील आणि गर्भाची डीएनए चाचणी करण्यात आली. आता डीएनए चाचणीचा अहवाल आला आहे. या अहवालात मुलीवर तिच्या वडिलांनीच बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.