शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (09:12 IST)

सियाचीनमध्ये ऑक्सिजन बँक, सिर्फ फाउंडेशनचा पुढाकार

सिर्फ फाउंडेशनच्या माध्यमातून सियाचीनमध्ये सैनिकांसाठी ऑक्सिजन पुरवठा प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी किमान एक कोटी दहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी निधी जमवण्याची सुरुवात म्हणून सुमेधा चिथडे यांनी स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या विकल्या असून, त्यातून आलेले सुमारे सव्वा लाख रुपये त्यांनी या कामासाठी देणगी म्हणून दिले आहे.
 
त्या निर्णयाला अनेक लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दूरदूरहून लोक त्यांना जमेल तेवढी आर्थिक मदत देत आहेत.  लवकरात लवकर निधि मिळावा यासाठी सिर्फ फाउंडेशन ठिकठिकाणी त्या देणगी देण्याची आणि सैनिकांबद्दलचे प्रसंग सांगत आहे.
 
सियाचीन हा सर्वांत उंच बर्फाळ प्रदेश असून, सामरिकदृष्ट्याही तो अत्यंत महत्त्वाचा प्रदेश आहे. त्यामुळे त्या भागात तैनात असलेल्या जवानांची खूप मोठी परीक्षा असते.