कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून फाशी
भारताचे माजी नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्ताननं मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानातल्या रावळपिंडी न्यायालयानं कुलभूषण यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
कुलभूषण जाधवांवर भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉचे एजंट असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. जाधव यांना 3 मार्च 2016ला पाकिस्ताननं बलुचिस्तानमधून अटक केली होती. पाकिस्तानी आर्मी अॅक्ट(PAA)अंतर्गत हेरगिरी केल्याचा ठपका ठेवत फील्ड जनरल कोर्ट मार्शल(FGCM)नुसार त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स(ISPR)नं दिली आहे.