सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 8 एप्रिल 2021 (10:23 IST)

पीएम यांनी लसचा दुसरा डोस घेतला, म्हणाले कोरोनाला पराभूत करण्यासाठी लस आवश्यक

वाढत्या करोना संक्रमणा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी नियमानुसार, कोविड लसीचा दुसरा डोस घेतलाय. खुद्द पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरून ही माहिती दिलीय. भारतात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत सहभागी होत नरेंद्र मोदींनी १ मार्च रोजी लसीचा पहिला डोस घेतला होता.
 
लसीकरण हे करोना विषाणूला हरवण्याचं आपल्याकडे असलेल्या काही उपायांपैंकी एक आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केलंय.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन‘ लस घेतलीय. ‘आज मी एम्समध्ये कोविड १९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. करोनाला हरवण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या उपायांपैकी एक उपाय लसीकरणाचा आहे. तुम्ही लस घेण्यायोग्य असाल तर लवकर लस घ्यावी’ असं म्हणत पंतप्रधानांनी को-विन वेबसाईटची लिंकही (CoWin.gov.in) आपल्याट्विटमध्ये जोडलीय.