कोरोनाविरोधात लढण्याची सविस्तर योजना सादर करा- सुप्रीम कोर्ट

suprime court
Last Modified गुरूवार, 22 एप्रिल 2021 (21:55 IST)
देशातील कोरोना स्थितीची दखल घेत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर तुमची काय योजना आहे अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला केली आहे.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने ऑक्सिजनचा तुटवडा, औषधांचा तुटवडा, सोयी-सुविधांचा अभाव या गोष्टींची दखल घेतली. सध्याची स्थिती चिंताजनक आहे, असं सरन्यायाधीश म्हणाले.

राज्यांना ऑक्सिजन पुरवण्याची योजना काय, औषधांची, लसीची स्थिती काय याबाबत केंद्राने निश्चित उपाययोजना करून पावले उचलावीत असं म्हटले आहे. याबाबतची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करत असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी देशाला ऑक्सिजनची खूप गरज असल्याचं सांगितलं.

त्या दृष्टीने वेदांताचा प्लांट उघडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी वेदांता आणि केंद्र सरकारकडून करण्यात आली. वेदांताची बाजू ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी मांडली.

पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वेदांताचा प्लांट बंद करण्यात आला होता. पण सध्या लोक मृत्युमुखी पडत आहे. ते पाहून हा प्लांट सुरू करण्याची परवानगी द्यावी असं साळवे यांनी सांगितलं. जर परवानगी मिळाली तर पाच सहा दिवसात हा प्लांट सुरू करता येईल असंही ते म्हणाले.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

चेतावणी ! केंद्राचे वैज्ञानिक सल्लागार यांनी कोरोनाची ...

चेतावणी ! केंद्राचे वैज्ञानिक सल्लागार यांनी  कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा दिला
केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजयराघवन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत कोरोना ...

सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्के मर्यादेचे उल्लंघन करत मराठा ...

सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्के मर्यादेचे उल्लंघन करत मराठा आरक्षण रद्द केले
महाराष्ट्र सरकारने दिलेले मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळले आहे. आरक्षणाची सुनावणी ...

जेईई मेन 2021: एनटीएने जेईई मुख्य मे 2021 च्या सत्रासाठी ...

जेईई मेन 2021: एनटीएने जेईई मुख्य मे 2021 च्या सत्रासाठी परीक्षा तहकूब केली - शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक
जेईई मेन 2021: कोरोना संकटाची सद्यस्थिती लक्षात घेऊन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा ...

मोठी बातमी , हैदराबाद प्राणी संग्रहालयातील 8 सिंहांना ...

मोठी बातमी , हैदराबाद प्राणी संग्रहालयातील 8 सिंहांना कोरोनाची लागण
हैदराबाद: एकीकडे, कोरोनाव्हायरसने सर्वीकडे उच्छाद मांडला आहे, मानवांमध्ये कोरोनाने कहर ...

“पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात”, ...

“पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात”, भाजपाची प्रतिक्रिया
पश्चिम बंगालच्या निकालावरुन राज्यात महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधकांमध्ये जोरदार ...