शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 20 डिसेंबर 2021 (14:37 IST)

दारूच्या नशेत पित्याने 13 महिन्यांच्या मुलाला नदीत फेकले,' हे' कारण होते

बेगुसरायमधून माणुसकीला लाजवणारी अशी बातमी येत आहे. एका नराधम  पिता मनीष कुमार यांनी आपला 13 महिन्यांचा निष्पाप मुलगा शिवम याला जिल्ह्यातील भगवानपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बनवारीपूर गावात बालन नदीत फेकून दिले. यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी घडली. या खळबळजनक घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. मृतदेह आढळून येताच कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. आई कांचन देवी हंबरडा फाडून रडू लागली. पोलीस ठाण्याचे प्रभारी मनीष कुमार यांनी मृतदेह ताब्यात घेऊन सोमवारी सकाळी सदर रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
सदर रूग्णालयात मृत मुलाची आई कांचन देवी यांनी सांगितले की, रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ती आपल्या माहेरी जाण्याच्या तयारीत होती. त्याचवेळी तिचा पती मनीष कुमार दारूच्या नशेत आला आणि पत्नीला तिच्या माहेरच्या घरी जाण्यास नकार देऊ लागला. यावरून पती-पत्नीमध्ये बराच वाद झाला होता. या वादाचा रागाच्या पतीने तीन महिन्यांचा निष्पाप मुलगा शिवम याला सोबत नेले आणि बालनदीच्या पाण्यात फेकून त्याची हत्या केली.
पीडितेची आई कांचन देवी यांनी मुलाचा खूप शोध घेतला मात्र तो सापडला नाही. त्यानंतर पतीकडे जाऊन शिवम कुठे आहे, असे विचारले. त्यावर ते म्हणाले की, मूल बोटीवर फिरत आहे. बालन नदीत बऱ्याच काळ शोधल्यावर  चिमुकल्या मुलाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. या घटनेनंतर स्थानिक लोकांनी भगवानपूर पोलीस ठाण्याला माहिती दिली.
घटनास्थळी  भगवानपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी पोहचून आरोपी वडिलांना अटक केली. पोलिसांच्याकसून चौकशी केल्यानंतर मनीषने गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेनंतर कलियुगी बाप जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.
आरोपी पिता मनीष कुमार आणि कांचन देवी यांचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. कांचन देवी यांना पाच वर्षांचा मुलगा रिशू राज आणि एक लहान मुलगा 13 महिन्यांचा शिवम होता. कांचनचे आयुष्य सुखाने चालले होते. पण दारूने त्यांच्या कुटुंबाचा नाश केला.