Tripura: माणिक साहा होणार त्रिपुराचे मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय
त्रिपुराच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झाले आहे. येथे पक्षाने माणिक साहा यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माणिक साहा त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. साहा दुसऱ्यांदा राज्यातील सरकारची सूत्रे हाती घेतील. तत्पूर्वी, सोमवारी संध्याकाळी त्रिपुरा भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. यामध्ये माणिक साहा यांच्या नावावर एकमत होऊन त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. दरम्यान, माणिक साहा यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.8 मार्च रोजी शपथविधी सोहळा होणार आहे.
बिप्लब कुमार देब यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले. माणिक साहा यांनी 15 मे 2022 रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.2020 मध्ये त्यांना त्रिपुरामध्ये पक्षप्रमुख बनवण्यात आले. माणिक साहा हे मुख्यमंत्री होण्याच्या एक महिना आधी राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर, बिप्लब देब राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले
निवडणुकीच्या निकालात भाजपने राज्यात आपली सत्ता कायम ठेवली. भाजपला ३२ आणि आयटीएफटीआयसीला एका जागेवर यश मिळाले. काँग्रेस आणि डाव्या आघाडीला मोठा धक्का बसला. काँग्रेसला तीन जागा मिळाल्या, तर डाव्यांना 11 जागा मिळाल्या. राज्यातील तेरा जागा टिपरा मोथा पक्षाच्या वाट्याला गेल्या आहेत, जे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत.
Edited By - Priya Dixit