रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

यूपी: काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी झाली आहे. गांधी परिवाराचे परंपरागत बालेकिल्ले असलेल्या उत्तर प्रदेशातील ही निवडणूक अखिलेश यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसतर्फे देण्यात आले आहेत. लवकरच उमेदवार यादीही जाहीर होईल.

दरम्यान, काँग्रेसने शीला दीक्षित यांचे नाव मागे घेतले आहे. त्या पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार होत्या. अखिलेश यांच्या 'सपा'सोबत जाण्याचा निर्णय होताच आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे दीक्षित यांनी लगेच स्पष्ट केले आहे.