मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 29 जून 2020 (09:00 IST)

Zomato च्या कर्मचाऱ्यांनी चीनविरोधात कंपनीचे टी-शर्ट जाळले

भारत-चीन वादामुळे देशभरात चीनविरोधात संतापाची लाट आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या काही कर्मचाऱ्यांनी कंपनीचे टी-शर्ट जाळले. कर्मचार्‍यांनी झोमॅटोमधील चिनी कंपनीच्या गुंतवणूकीला विरोध करत निदर्शने केली.
 
चीनमधील आघाडीची कंपनी अलिबाबाची उपकंपनी असलेल्या अँट फायनान्शियलने 2018 मध्ये झोमॅटोत 21 कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. या कंपनीचा झोमॅटोमध्ये 14.7 टक्के हिस्सा आहे. याशिवाय झोमॅटोने नुकताच अँट फायनान्शियलकडून 15 कोटी डॉलरचा निधी मिळविला आहे. 
 
झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांनी कोलकात्याच्या बेहला येथे चीनविरोधात निदर्शनं केली. कंपनीमध्ये चिनी कंपनीच्या गुंतवणूकीमुळे अनेकांनी राजीनामा दिल्याचा दावाही केला. काही जणांनी या कंपनीची सेवा घेण्यास नकार दिला. दरम्यान, झोमॅटोनेही यावर अद्याप काहीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.