शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By सॉ. अर्चना गजेंद्र भटूरकर|

अस्वलाच्या हमल्यात ठार झालेल्या दोघांचे मृतदेह सापडले

अस्वलाच्या हमल्या ठार झालेल्या दोन गावकर्‍यांचे मृतदेह काल रात्री उशीरा एका गुहेत सापडले.

पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार छत्तीसगड राज्यतील कोरबा पोलिस चोकी अंतरगत निवास करणार करणसाय सारथी (वय 32) व रमाशंकर सारथी (38) आपापल्या पत्नीबरोबर काला संध्याकाळी लाकडे तोडण्यासाठी छिरा कछारच्या जंगलात गेले होते. तेथे त्यांच्यावर अचानक अस्वलांनी हमला केला. पत्नींना वाचवण्याच्यासाठी ते दोघेही अस्वलाबरोबर लढले.

अस्वलाने त्यां दोघांना मारले व त्यांचा मृतदेह आपल्या गुहेत नेला. या घटनेची माहिती मृतांच्या पत्नींनी गावात जाऊन सांगितली. यानंतर ग्रामिण पोलिस व वनविगागाच्या अधिकार्‍यांनाही याची माहिती देण्यात आली. वन विभाग व पोलिसांच्या संयुक्त दलाने जंगलात जाऊन शोधाशोध सुरू केली. रात्री उशीला त्यांना अस्वलाच्या गुहेत त्या दोघांचे मृतदेह मिळाले. मात्र अस्वल तेव्हा तेथे नव्हते.

वन विभागाने यात मृत्यु झालेल्या दोघांच्या नातेवाईकांना तत्काळ मदत म्हणून प्रत्येकी दहा हजार रूपयांची मदत दिली.