चिनी बाजूने सैन्य जमवाजमव नाही!
चीनच्या बाजूने सीमेवर सैन्याची जमवाजमव झालेली नाही, असा निर्वाळा लेफ्टनंट जनरल व्ही. के. सिंग एका वरिष्ठ लष्करी अधिकार्याने दिला आहे. श्री. सिंग हे पूर्वेकडील भारतीय सैन्याचे प्रमुख आहेत. सध्या उद्भवलेला वाद हा निव्वळ राजकीय असून तो लष्करी नाही, असेही या अधिकार्याने स्पष्ट केले. पूर्वेकडील सीमेवर चीन सैन्याची जमवाजमव करत असल्याच्या बातम्या येत असल्याबद्दल श्री. सिंग यांना विचारले असता, या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगितले. हा फक्त दृष्टिकोनाचा फरक असल्याचे ते म्हणाले. फक्त पाच वाहनेदेखील सीमेच्या दिशेने आली तरी चीनी लष्करच आपल्या देशात घुसले आहे, असे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे या घटनकडे पाहण्याचा त्यांचा हा दृष्टिकोन आहे, असे मत श्री. सिंग यांनी नोंदवले.