अवघ्या 4,666 रुपयांत 4जी स्मार्टफोन!
स्वाइप टेक्नॉलॉजीनं Elite 2 बजेट 4जी स्मार्टफोन लॉन्च केलाय. याची किंमत अवधी 4,666 रुपये आहे. अँड्रॉइड 5.1 लॉलीपॉपवर चालणार्या या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेल रियर आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिलाय.
4.5 इंच qHD IPS डिस्प्ले असलेल्या या डय़ूअल सिम स्मार्टफोनमध्ये 1 जीबी रॅमसोबत 1.3 GHz स्पीडचा क्वाडकोर प्रोसेसर दिलाय. सोबतच याची इंटरनल मेमरी 8 जीबी आहे.
जे एसडीकार्डद्वारे 32जीबीपर्यंत वाढवू शकतो.
या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, ब्लूटूथ, यूएबी, जीपीएस आणि ए जीपीएससारख्या सुविधा दिल्या आहेत. स्पेसिफिकेशन : प्रोसेसर : 1.3GHz Media Tek क्वाडकोर
रॅम : 1 GB, कॅमेरा : 8 मेगापिक्सल रियर, 5 मेगापिक्सल फ्रंट
डिस्प्ले : 4.5 इंच IPS HD मेमोरी : 8GB बॅटरी : 1,900 mh
ओएस : अँड्रॉइड 5.1 लॉलीपॉप.