1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Updated : सोमवार, 25 जुलै 2016 (10:04 IST)

सचिनचे ‘डिजिटल गेमिंग’मध्येही पदार्पण

फलंदाजीचा विक्रमादित्य सचिन तेंडुलकर आता ‘सचिन सागा’या डिजिटल गेमच्या माध्यमातून डिजिटल गेमिंगमध्ये पदार्पण करीत आहे. ‘जेट सिंथेसिस’ या कंपनीच्या डिजिटल गेमिंग विभाग असलेल्या प्लेझोनने सचिनसाठी हा खेळ विकसित केला असल्याची माहिती कंपनीचे उपाध्यक्ष राजन नावानी यांनी दिली. डिजिटल गेमच्या माध्यमातून चाहत्यांसमोर येताना आपल्याला खूप उत्सुकता आणि आनंद होत असल्याची भावना सचिनने या निमित्ताने व्यक्त केली. या खेळाच्या विकसनामध्ये आपणही काही टप्प्यांवर सहभागी होतो. या खेळाचा आनंद रसिक मोठय़ा प्रमाणावर लुटू शकतील; असा विश्वास सचिनने व्यक्त केला.