1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 21 ऑगस्ट 2014 (16:15 IST)

‘फ्री’ होणार वॉटस् अँप, स्काईप, हाईक, व्हायबर

टेलिकॉम रेग्युलेटर ऑथोरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) मोबाइल ऑपरेटर्सचा प्रस्ताव धुडकावून वॉटस् अँप, व्हायबर, स्काईप, हाईक यासारख्या अँप्ससाठी भविष्यात शुल्क द्यावे लागणार नसून हे अँप्स आता मोफत वापरायला मिळणार आहेत.
 
या अँप्समुळे एसएमएस आणि कॉल्सची होणारी संख्या कमी होत असून इंटरनेट डाटा सर्व्हिसच्या माध्यमातून मोबाइल ऑपरेटर्स त्यांचे नुकसान भरुन काढण्यास सक्षम असल्याचे ट्रायने म्हटले आहे. गेल्या काही वर्षामध्ये वॉटस् अँप, व्हायबर, स्काईप, हाईक अशा अँप्सचे प्रमाण वाढत असून या अँप्समुळे मोफत मेसेज आणि व्हॉईस कॉलिंग करणे शक्य झाले असल्यामुळे मोबाइल ऑपरेटर कंपन्यांना एसएमएस आणि कॉल्सद्वारे मिळणारे उत्पन्न घटत होते. फ्री मेसेंजर सर्व्हिसेस आणि फ्री इंटरनेट व्हाईस कॉलिंगमुळे दरवर्षी पाच हजार कोटींचे नुकसान होते असा दावा या कंपन्यांनी केला होता. त्यामुळे या अँपवर शुल्क आकारावे, असा प्रस्ताव सर्व मोबाइल सर्व्हिस ऑपरेटर कंपन्यांनी ट्रायकडे दिला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला असता तर हे अँप्स वापरण्यासाठी युझर्सना पैसे मोजावे लागले असते. ट्रायने हा प्रस्ताव धुडकावून लावल्याने मोबाइल युझर्सवर अँप्ससाठी आता पैसे मोजावे लागणार नाहीत. टेलिकॉम विश्वातील एक तृतीयांशी उत्पन्न हे डाटा सर्व्हिसेसच्या माध्यमातून येत आहे. आगामी काळात हे प्रमाण वाढण्याची शक्यताही ट्रायच्या एका अधिकार्‍याने वर्तवली आहे. त्यामुळे अशा अँप्सवर शुल्क आकारण्यासंदर्भातील विचारविनीमय करण्याचा प्रस्तावही आम्ही स्वीकारणार नाही असे या अधिकार्‍याने सांगितले.