शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: सोमवार, 3 डिसेंबर 2018 (14:26 IST)

Meizu M16T आणि Meizu M16th भारतात 5 डिसेंबर रोजी लॉन्च होणार

चिनी मोबाइल मेकर कंपनी मेझू दीर्घ काळानंतर भारतीय बाजारात परतणार आहे. नवी दिल्ली येथे 5 डिसेंबर
रोजी आयोजित होणार्‍या कार्यक्रमादरम्यान कंपनी फ्लॅगशिप हँडसेट Meizu M16th आणि बजेट स्मार्टफोन
लॉन्च करणार आहे. या दोन हँडसेट व्यतिरिक्त, तिसरा मिड-रेंज स्मार्टफोन देखील लॉन्च केला जाणार आहे ज्याची सध्या काहीही माहिती नाही आहे. मेझूने गेल्या वर्षी भारतात Meizu M5 स्मार्टफोन लॉन्च केला होता.
 
Meizu M16th च्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल बोलू तर हा हँडसेट इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, क्वेलकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर आणि एमचार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात Meizu M16th चीनमध्ये Meizu 16 नावाने लॉन्च केले गेले. Meizu 16 बरोबर Meizu 16 Plus देखील लॉन्च करण्यात आला होता. चीनी बाजारात Meizu 16 च्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत
2,698 चीनी युआन (सुमारे 27,100 रुपये) आहे. Meizu 16 Plus च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 3,198 चीनी युआन (सुमारे 32,100 रुपये) आहे. त्याची 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 3,498 चीनी युआन (सुमारे 35,100 रुपये) आहे.