शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By वार्ता|
Last Modified: बिजींग, , मंगळवार, 19 ऑगस्ट 2008 (15:14 IST)

अंजुचा आजवरचा सर्वांत खराब खेळ

तीनही प्रयत्‍न फाऊल

ND
आपल्‍या फिटनेसमुळे गेल्‍या अनेक दिवसांपासून अडचणीत असलेली लांबउडी पटू अंजू बॉबी जॉर्ज ने बिजींग ऑलम्पिकमध्‍ये आपल्‍या कारकिर्दीतला सर्वांत खराब खेळ केला. तिचे तीनही प्रयत्‍न फाउल ठरले. त्‍याबरोबरच एथलेटिक्समध्‍ये भारताची शेवटची आशाही धुळीस मिळाली आहे.

31 वर्षीय अंजू लांब उडी स्‍पर्धेत सुरुवातीच्‍या फेरीतच आपल्‍या तीनही प्रयत्‍नात एकदाही सहज उडी घेण्‍यात यशस्‍वी ठरू शकली नाही. त्‍यासोबतच ती कोणतेही गूण न मिळविता सहज बाहेर पडली आहे.

यंदाच्‍या मोसमात अद्याप चांगला खेळ करू न शकलेल्‍या अंजुकडून संघाला पदकाची अपेक्षा तशी नव्‍हतीच. मात्र ती निदान अंतिम सामन्‍यापर्यंत तरी जाईल अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र तिच्‍या या खेळामुळे सगळया अपेक्षा फोल ठरल्‍या आहेत.