शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By वार्ता|

अखिलपाठोपाठ जितेंद्र व विजेंद्र उपांत्यपूर्व फेरीत

ऑलिंपिकमध्ये मुष्टियोद्धात आज भारताला एक नव्हे तर दोन आनंदवार्ता मिळाल्या. भारताचे दोन मुष्टियोद्धे जितेंद्र कुमार व विजेंद्र कुमार हे दोघेही प्रतिस्पर्ध्यांना धुळ चारून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत.

जितेंद्र व विजेंद्र यांच्या या पराक्रमाने उपांत्यपूर्व फेरीत अखिल कुमारसह भारताचे तीन खेळाडू पोहोचले आहेत. शुक्रवारी अखिल कुमारने रशियाच्या विश्वविजेत्याला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

जितेंद्रने ५१ किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या तुलाशबॉय देनियोरोवला १३-६ असे पराभूत केले. तर विजेंद्र कुमारने ७५ किलो वजनी गटात मिडलवेट वर्गात थायलंडच्या अंकखान चोम्फूफुआंगला १३-३ अशी माती खायला लावली.

भारतीय मुष्टियोद्ध्यांच्या या कामगिरीने भारताला यात किमान काही ना काही तरी पदक मिळेल, अशी आशा आहे.