शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By वेबदुनिया|
Last Modified: बिजींग, , सोमवार, 18 ऑगस्ट 2008 (18:05 IST)

अखिल कुमार 3-10 ने पराभूत

ऑलम्पिक खेळांच्‍या 54 किलोग्राम बॅन्‍टम वेटच्‍या उपउपांत्‍य सामन्‍यात भारताचा अखिल कुमारला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्‍यामुळे तमाम भारतीयांना त्‍याच्‍याकडून पदकाची असलेली आशा धुळीस मिळाली आहे. वाल्डोवाचा बॉक्‍सर गोजान वेसेस्लाव याने अखिल कुमारचा 10-3 ने पराभव केला आहे.

भारताचा अखिल कुमार आणि गोजान वेसेस्लाव दूस-या फेरीच्‍या अखेरीपर्यंत 2-2 ने बरोबरीत होते. तिस-या फेरीत अखिल 2-6 ने मागे पडला. या फेरीत अखिलला एकही गुण मिळविता आला नाही. चौथ्‍या फेरीत अखिलचे डावपेच चालू शकले नाहीत आणि गोजान वेसेस्लावचा बचावात्‍म पवित्रा अखिलला महाग पडला.

चौथ्‍या फेरीत गोजान वेसेस्लाव याने चार गूण मिळविले तर अखिल फक्‍त 1 च गूण मिळवू शकला. अशा प्रकारे चार फेरीच्‍या या स्‍पर्धेत गोजान वेसेस्लाव 10-3 ने विजयी झाला. त्‍याने आता उपांत्‍य सामन्‍यात प्रवेश मिळविला आहे.