Last Modified: बीजिंग , शनिवार, 16 ऑगस्ट 2008 (20:58 IST)
जमैकाचा बोल्ट जगातील सर्वांत वेगवान धावपटू
जमैकाचा युसेन बोल्ट जगातील सर्वांत वेगवान धावपटू ठरला आहे. त्याने ऑलिंपिकमध्ये आज शंभर मीटर शर्यतीत ९.६९ सेकंदांची वेळ नोंदवून नवा विश्वविक्रम केला आहे.
बोल्टने बर्ड्स नेक्स्ट स्टेडियममध्ये ९० हजार लोकांच्या साक्षीने हा पराक्रम केला. शंभर मिनिटांचे अंतर त्याने जणू पापणी लवते एवढ्या वेळेत पार केले. विशेष म्हणजे त्याने आपलीच ९.७२ सेकंद ही विश्वविक्रमी वेळ तीन सेकंदांनी मोडून काढली.
त्रिनिनिद व टोबॅगोचा रिचर्ड थॉम्सनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तो बोल्टपेक्षा वीस सेकंदांनी मागे राहिला. अमेरिकेच्या वॉल्टर डिक्सने कास्य पदक पटकावले.