शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By वार्ता|

फेडरर-वावरिंका जोडीने सुवर्ण जिंकले

ND
जागतिक क्रमवारीत पहिल्‍या क्रमांकाचा टेनिस खेळाडू म्‍हणून ओळख असलेल्‍या रॉजर फेडरर आणि त्‍याचा सहकारी स्तानिसलास वावरिंका यांच्‍या जोडीने शनिवारी बिजींग ऑलम्पिक खेळांमध्‍ये युगुल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

टेनिस कोर्टवर गेल्‍या पाच वर्षांपासून आपले वर्चस्‍व गाजवित असलेल्‍या फेडरर आणि वावरिंका यांनी एकत्र येउन स्वीडनचे सायमन एसपेलिन आणि थॉमस जोहानसन यांना 6-3, 6-4, 6-7, 6-3 ने हरवून स्विझरलॅण्‍डसाठी पदक जिंकले आहे.

ऑलम्पिकमध्‍ये गेल्‍या वेळी दोन वेळा अपयशाचा सामना करावा लागलेल्‍या फेडररने सुवर्णपदक जिंकल्‍यानंतर पचंड जल्‍लोष केला.