Last Modified: बीजिंग , रविवार, 17 ऑगस्ट 2008 (18:26 IST)
फेल्प्सचा आठ सुवर्ण पटकावून इतिहास
अमेरिकेचा जलतरणपटू मायकेल फेल्प्स याने विक्रमी आठवे सुवर्ण पटकावत ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला असून हे साध्य करणारा तो पहिला अॅथलिट ठरला आहे. याबरोबर त्याने अमेरिकेच्याच मार्क स्पित्झ याचा म्युनिच ऑलिम्पिकमध्ये (1972) सात सुवर्ण पटकावण्याचा विक्रमही मागे टाकला आहे.
तेवीस वर्षीय फेल्प्ससाठी हा आठवडा अविस्मरणीय ठरला आहे. त्याने सात जागतिक विक्रम मोडताना ऑलिम्पिक कारकीर्दीत चौदा सुवर्ण पटकावून सवौत्कृष्ठ ऑलिम्पियन ठरला आहे.
रीले संघाच्या विजयाने अमेरिकेची सुवर्णांची संख्या 17 पर्यंत पोहचली आहे मात्र चीनच्या 28 सुवर्णांच्या तुलनेत ते मागेच आहेत.