Last Modified: बीजिंग , शनिवार, 16 ऑगस्ट 2008 (18:14 IST)
मनदीप कौरची निराशाजनक कामगिरी
ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंची एथेलेटिक्समधील निराशाजनक कामगिरी दुसर्या दिवशीही सुरूच राहिली. डिस्कस थ्रो स्पर्धेत विकास गौडा फायनलमध्ये जाऊ शकला नाही. त्याचवेळी महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताची मनदीप दौर उपांत्य फेरीत स्थान मिळवू शकली नाही.
पंजाबच्या मनदीपने ५२.८८ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. ती स्वतःचीच राष्ट्रीय कामगिरी (५१.७४) गाठू शकली नाही. ५० धावपटूंमध्ये ती ३३ व्या स्थानावर राहिली. त्याचवेळी हीटमध्ये ती सातपैकी सहाव्या स्थानावर राहिली.
शुक्रवारपासून सुरू झालेल्या एथेलेटिक्स स्पर्धांत भारतीय एथलिट्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे. प्रीजा श्रीधरन (१००० मीटर), हरवंत कौर, कृष्णा पुनिया व विकास गौडा (सर्व डिस्कस), मनदीप कौर (शंभर मीटर) या सगळ्यांनी निराशाजनक कामगिरी केली आहे.