शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By वेबदुनिया|

मुष्टियोद्धा जितेंद्र कुमारही उपांत्यपूर्व फेरीत

भारताच्या अखिल कुमारने जगज्जेत्या रशियन मुष्टियोद्ध्याला धुळ चारून स्वातंत्र्यदिनी देशवासीयांना यशाची आगळी भेट दिली असताना आज ५१ किलो वजनी गटात जितेंद्रकुमारने उझबेकिस्तानच्या तुलाशबॉयला अस्मान दाखवून देशाला जणू रक्षाबंधनाची ओवाळणी घातली. त्याने तुलाशबॉयचा १३-०६ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत जागा पटकावली आहे.

जितेंद्रकुमारने सुरवातीपासूनच उझबेकिस्तानच्या या मुष्टियोद्ध्याला डोके वर काढू दिले नाही. त्याच्यावर प्रचंड दबाव आणून आपल्या ठोश्यांनी त्याला जेरीस आणले.

काल अखिल कुमारने जगज्जेत्या सर्गेई वोदापेनोव्हला धुळ चारली होती. त्याचीच प्रेरणा घेऊन जितेंद्र कुमारने हा पराक्रम केला. दोन मुष्टियोद्धे उपांत्यपूर्व फेरीत पोहोचल्याने भारताच्या पदकांच्या आशा वाढल्या आहेत.