शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By वार्ता|
Last Modified: बिजींग, , मंगळवार, 12 ऑगस्ट 2008 (14:35 IST)

राजवर्धन आणि समरेशचा नेम चुकला

बिजींग ऑलम्पिकमध्‍ये पदक मिळविण्‍याची मोठी अपेक्षा असलेले भारतीय निशाणेबाज राजवर्धन सिंह राठोड आणि समरेश जंग मंगलवारी ऑलम्पिकमधून बाहेर पडले आहेत.

बिजींग ऑलम्पिकच्‍या उदघाटन समारंभात भारतीय राष्‍ट्रीय ध्वजवाहक राजवर्धन राठोड अंतिम सामन्‍यासाठी पात्रता पूर्ण करू शकला नाही. पात्रता फेरीच्‍या पहिल्‍याच फेरीत 43 आणि दूस-या फेरीत 45 गुण मिळविले. तर तिस-या फेरीतही त्‍याने केवळ 43 गुण मिळविले. त्‍यामुळे केवळ 131 गुणांच्‍या निराशाजनक स्कोरवर त्‍यांना स्‍पर्धेतून बाहेर जावे लागले.

इटलीचा डी. एनीलो 141 गुणांनी पहिल्‍या स्‍थानी राहिला तर राजवर्धन 12 व्‍या स्थानी राहिला. तिकडे समरेशनेही अपेक्षा फोल ठरविल्‍या. 46 स्‍पर्धकांमध्‍ये तो 42व्‍या स्थानावर राहिला.