शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By वेबदुनिया|
Last Modified: बिजींग, , बुधवार, 20 ऑगस्ट 2008 (09:38 IST)

विजेंद्र आणि जितेंद्र यांची आज क्‍वा.फायनल

भारतीय बाक्सर जितेंद्रकूमार आणि विजेंद्रकूमार हे बुधवारी सायंकाळी बिजींग ऑलम्पिकमध्‍ये आपापला क्वार्टर फायनल सामना खेळणार आहेत. बॉक्सिंग संघातला वरिष्‍ठ खेळाडू अखिलकूमार याचे आव्‍हान सोमवारी संपुष्‍टात आल्‍याने आता या दोघांकडून अपेक्षा आहेत.

23 वर्षीय विजेंद्र 75 किलो मिडिलवेट प्रकारात इक्वेडोरचया कार्लोस गोंगोरा याच्‍याशी लढणार आहे. तर 51 किलोग्राम फ्लायवेट गटातला जितेंद्र तीन वेळा युरोपीयन स्‍पर्धांमध्‍ये चॅम्पियन ठरलेल्‍या रशियाच्‍या ग्रेगरी बलाकशीन याच्‍याशी लढणार आहे.