Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 27 ऑगस्ट 2008 (12:39 IST)
अधिक चांगल्या खेळाची प्रेरणा-बिंद्रा
ND
बिजींग ऑलम्पिक खेहांमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तीक सुवर्ण पदक जिंकून इतिहास घडविणा-या अभिनव बिंद्राने आपल्याला या खेळातून मिळालेले यश पुढच्या ऑलम्पिकमध्ये प्रेरणा देणारे ठरणार आहे.
अभिनव म्हणाला, की बिजींग ऑलम्पिकमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर देशात ऑलम्पिकशी जोडल्या गेलेल्या इतर खेळांनाही चालना मिळणार आहे. सोबतच एक सुवण्र आणि दोन कांस्यसह तीन ऑलम्पिक पदक जिंकल्यानंतर आता आपल्या खेळाडूंना लंदनमध्ये होणा-या ऑलम्पिकमध्ये चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळणार आहे.