मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By वार्ता|
Last Modified: बिजींग, , रविवार, 24 ऑगस्ट 2008 (14:37 IST)

अमेरीकेने जिंकले ऑलम्पिक व्‍हॉलीबॉलचे सुवर्ण

अमेरीकेने एक रोमांचक सामन्‍यात जगातल्‍या नंबर एकच्‍या ब्राजील संघाला 3-1 ने हरवून ऑलम्पिक व्‍हॉलीबॉल स्पर्धेतील सुवर्ण पदक जिंकले आहे.

दोन्‍ही संघांकडून सर्विसमध्‍ये अनेक चुका होऊनही ब्राजीलने पहिला सेट 25-20 ने जिंकला. मात्र अमेरीकेने जबर्दस्त प्रदर्शन करताना दूसरा सेट जिंकुन बरोबरी साधली.

ब्राजीलने तिस-या फेरीत खेळावर मजबूत पकड करण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र सर्व्‍हीसमध्‍ये अनेक चुकांमुळे त्‍यांन सेट गमवावा लागला. चौथ्‍या सेटमध्‍ये बराच काळ मागे राहिलेल्‍या अमेरीकेने निर्णायक क्षणी दोन गुणांची आघाडी घेत सूवर्ण पदक आपल्‍या नावावर करून घेतले. स्पर्धेत रशियाने कांस्य पदक मिळविले.