शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By वार्ता|

ऑलिंपिकमध्ये तीन हजार 667 खेळाडूंची डोप टेस्ट

चीनमध्ये सुरू असलेल्या ऑलिंपिकमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी उत्तेजक द्रव्य चाचणी घेण्यात आली. यात तीन हजार 667 खेळाडूंच्या रक्तांचे नमुने घेण्यात आले असून यात दोषी आढळलेल्या खेळाडूंविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आंतररराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने स्पष्ट केले आहे.

युनानी खेळाडू चाल्किया हा या चाचणीत दोषी आढळून आला असून, त्याच्यासह त्याचे प्रशिक्षक जॉर्ज यांच्यावरही कारवाईचे संकेत समितीने दिले आहेत.

आयओसीने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 3667 खेळाडूंची चाचणी करण्यात आली असून यात 2905 खेळाडूंचे मूत्र तर 762 खेळाडूंच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.