शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By भाषा|
Last Modified: जीकरपुर , रविवार, 17 ऑगस्ट 2008 (13:09 IST)

पुढच्या ऑलिंपिकमध्ये भारताचे 'दस का दम'

बिंद्राला विश्वास

भारतीय खेळाडूंमध्ये प्रतिभेची कमी नाही त्यांना केवळ योग्य मार्गदर्शन आणि सोयी-सुविधांची गरज असून हे त्यांना मिळाल्यास पुढील ऑलिंपिकमध्ये भारतीय किमान 10 पदकांची कमाई निश्चितच करतील असा विश्वास ऑलिंपिकमध्ये भारतीयांना पहिले सुवर्णपदक मिळवून दिलेल्या अभिनव बिंद्राने व्यक्त केला आहे.

आजही भारतात कोणत्याही खेळात खेळाडू नाहीत असे नाही, तर त्यांच्यात प्रतिभा असताना केवळ त्यांना योग्यते मार्गदर्शन मिळत नसल्याने ते मागे पडत असल्याची खंत बिंद्राने व्यक्त केली.