Last Modified: बीजिंग , शुक्रवार, 22 ऑगस्ट 2008 (16:40 IST)
श्वाजेरने जिंकली 50 किमी चालण्याची स्पर्धा
इटलीच्या एलेक्स श्वाजेरने आज झालेल्या 50 किमीच्या चालण्याच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या जॉरेड टॉलेंटचा पराभव करत नवीन विश्वविक्रम स्थापन करत सुवर्णपदक खिशात घातले.
एथेंस ऑलिंपिकमधील रजत पदक विजेता रशियाच्या डेनिस निजेगोरोदेव याला यावेळी कास्य पदकावर समाधान मानावे लागले. श्वाजेरने तीन तास आणि 37.09 मिनिटांत ही स्पर्धा जिं कली. श्वाजेरने 20 वर्षांपूर्वीचा रेकॉर्डही या स्पर्धेत मोडला.