शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By वार्ता|
Last Modified: बीजिंग , सोमवार, 11 ऑगस्ट 2008 (16:15 IST)

सायना नेहवाल उपांत्यफेरीत

भारताच्या सायना नेहवालने जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावर असलेल्या हॉंगकॉंगच्या चेन वांगला हरवून ऑलिंपिकमध्ये महिलांच्या एकल बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.

सायनासाठी हा सामना अतिशय आव्हानात्मक होता. पण तिने आपल्या प्रतिस्पर्धी वांगला २१-१९,११-२१,२१-११ असे हरविले. ५२ मिनिटांपर्यंत चाललेला हा सामना चांगलाच रंगला. अठरा वर्षांची सायना पहिल्या गेममध्ये १६-१९ अशी पिछाडीवर होती. पण त्यानंतर तिने वांगला गुडघे टेकायला लावत पाच गुण वसुल केले. दुसर्‍या गेममध्ये दोघी ७-७अशा बरोबरीवर होत्या. पण वांगने दुसरा सेट जिंकला. पण तिसर्‍या सेटमध्ये मात्र तिने कमाल करत वांगला डोके वर काढू दिले नाही आणि २१-११ अशा फरकाने हा गेम खिशात घातला.