Last Modified: नवी दिल्ली, , बुधवार, 20 ऑगस्ट 2008 (16:39 IST)
सुशील कुमारला 50 लाखांचा पुरस्कार
बिजींग ऑलम्पिकमध्ये कुस्तीत कांस्य पदक मिळविणा-या भारतीय पैलवान सुशील कुमारच्या यशाबद्दल दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी त्याला 50 लाख रुपयांच्या पुरस्काराची घोषणा केली आहे.
सुशीलचया विजयावर मुख्यमंत्री दीक्षित यांनी आनंद व्यक्त केला असून तो भारतात आल्यानंतर त्याचे प्रशिक्षक सतपाल यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात त्याला सन्मानित केले जाणार आहे.
देशभरातून सुशीलला शुभेच्छा संदेश पाठविले जात असून आहेत. पारितोषिक वितरण समारंभात पदक विजेता सुशीलकुमार शांत होता. विजेत्यांना पोलवॉल्टचे बादशाह सर्गेई बुबका यांनी पदकांचे वितरण केले.