मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By वेबदुनिया|

सुशील कुमारला शुभेच्‍छा द्या

ND
भारताच्‍या आणि विशेषतः महाराष्‍ट्राच्‍या मातीतल्‍या कुस्‍ती या अस्‍सल भारतीय खेळात 56 वर्षांच्‍या प्रतीक्षेनंतर बिजींग ऑलम्पिकमध्‍ये सुशील कुमारने कांस्य पदक मिळवून दिले. कजाकिस्‍तानच्‍या पैलवानाला पराभूत करून सुशीलने मिळविलेला हा विजय निश्चितच कौतुकास्‍पद आहे. 1952 मध्‍ये पहिल्‍यांदाच खाशाबा जाधव यांनी कुस्‍तीत कांस्य पदक जिंकले होते.

हा दिवस केवळ सुशील कुमार साठीच नव्‍हे तर तमाम भारतीयांसाठी आनंदाचा आणि गौरवास्‍पद आहे. बिजींगच्‍या धर्तीवर अभिनव नंतर पुन्‍हा तिरंगा फडकला आहे. सुशीलच्‍या या यशाबद्दल त्‍याला शुभेच्‍छा दिल्‍याच पाहिजेत तर मग मांडा तुमचे विचार वेबदुनिया तुम्‍हाला देत आहे. त्‍यासाठीचे व्‍यासपीठ....