करिअर शिफ्ट करताना महत्तवाच्या गोष्टी ?

career
कोणत्याही क्षेत्रातील करिअरमध्ये बराच काळ काम केल्यानंतर अनेक युवा मित्र-मैत्रिणी करिअर शिफ्ट करण्याची इच्छा बाळगतात. त्यांना जी गोष्ट आपल्याला आवडते त्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते. अशा प्रकारच्या करिअर शिफ्टमध्ये केवळ एक प्रकारचा धोकाच नसतो तर हे करिअरचं असं एक वळण असतं ज्यामध्ये आपल्यावर आर्थिक रुपाचा बोजाही असतो. अशावेळी आपण आपल्या करिअरमध्ये बदल करणार असाल तर काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं.

केवळ आपल्याला बदल हवा म्हणूनच आपण करिअर शिफ्ट केलं आणि नंतर आपल्याच पायावर आपण धोंडा मारुन घेतला, असं आपल्याला वाटू नये यासाठी काही बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे.

पैसा हेच सर्व काही नाही, ही गोष्ट सर्व प्रथम लक्षात घ्या. करिअरमध्ये बदल करत असताना आपण सध्या जे काम करत आहोत त्यामध्ये कमी पैसे मिळतात आणि करिअर बदलल्यानंतर त्यामध्ये यापेक्षा जास्त पैसे मिळतील असे विचार तुमच्या मनात येत असतील तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात, हे लक्षात घ्या. प्रत्येक करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया असते. त्यामुळे केवळ पैशांकडेच पाहून करिअर शिफ्ट करु नका.

अनेक तरुणांना दुस-यांचं अनुकरण करण्याचीही सवय असते. एकाने केलं तेच आपणही केलं तर आपलंही भलं होईल, असं त्यांना वाटत असतं. पण, प्रत्येकवेळी हा फॉम्र्युला यशस्वी होतोच, असं नाही. करिअर शिफ्ट करण्याच्या बाबतीतही तेच आहे. ब-याचदा असं दिसतं की, एखादी व्यक्ती सलग सात-आठ वर्ष एखाद्या कंपनीत काम करत असते. त्याच्याबरोबर कंपनीत काम करणा-या दुस-या एखाद्या सहका-याने आपलं करिअर शिफ्ट केलं. कारण, त्याला मिडियामध्ये काम करण्याची इच्छा होती. अशावेळी आपल्या सहका-याने करिअर शिफ्ट केलं म्हणून तसंच आपणही करु नका. आपल्याला कोणतं वातावरण सूट करतं, हे आधी ठरवा.

त्याचवेळी आपल्या क्षमताही ओळखणं गरजेचं आहे. अनेकदा तरुण उत्साहाच्या भरात करिअर शिफ्ट करण्याचा विचार करतात. काहीजण त्याची अंमलबजावणीही करतात. अशावेळी ते दुस-या करिअरमध्ये काम सुरु करतात त्यावेळी त्यांना तेथील वातावरण सूट होतंच असं नाही. याचं कारण आपल्या क्षमता न ओळखता निर्णय घेतल्यामुळे असं होऊ शकतं. त्यामुळे करिअर शिफ्ट करण्याआधी त्या क्षेत्रात काम करण्याची आपली क्षमता कितपत आहे याचा विचार करणं आवश्यक आहे. कोणत्याही पर्यायाची निवड करताना जणू काही तो आपल्यासाठी शेवटचाच पर्याय आहे, असा विचार करुन त्याची निवड करु नये. यासंबंधी आपण द्विधा मन:स्थितीत असाल तर आधी स्वत:चं आकलन करा.

अनेक तरुण मित्र पाच वर्षाच्या करिअरनंतर आपल्या पसंतीच्या करिअरमध्ये जाण्यासाठी नवी डिग्री घेण्यासही तयार होतात. पण, ही गोष्ट लक्षात घ्या की, आपण पाच वर्षानंतर पुन्हा शिक्षण घेण्यासाठी जात आहात. डिग्री आपल्यासाठी फायदेशीरही ठरु शकते आणि नुकसानकारकही. कारण डिग्री मिळवण्यासाठी आपलं लक्ष दुसरीकडे केंद्रीत झालेलं असतं आणि सध्या आपण जे काम करत आहोत त्यामध्ये आपलं लक्ष नसतं. अशावेळी आपली परिस्थिती ‘ना इधर का ना उधर का’ अशी होऊ शकते. त्यामुळे करिअरमध्ये बदल करण्यासाठी मोठे निर्णय आपण घेऊ नयेत. याविषयी आपल्या कुटुंबियांशी आणि मित्रांशीही चर्चा करावी. कदाचित आपली ही समस्या ते सोडवू शकतात.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

मोसंबीचा रस केसांसाठी फायदेशीर

मोसंबीचा रस केसांसाठी फायदेशीर
प्रत्येक घरात थंड हवामानात हंगामी अन्न घेणं सगळ्यांनाच आवडतं. त्या मधील व्हिटॅमिन सी ...

आंबट द्राक्षे : कोल्ह्याची मजेदार गोष्ट

आंबट द्राक्षे :  कोल्ह्याची मजेदार गोष्ट
एका जंगलात एक कोल्हा राहायचा. तो जंगलात भटकंतीचं करायचा. एके दिवशी तो अन्नाच्या शोधात ...

मिक्स व्हेज ग्रिल सँडविच

मिक्स व्हेज ग्रिल सँडविच
सकाळच्या न्याहारीत काही निरोगी आणि चविष्ट खायचे असले तर आपल्या डोळ्यापुढे चटकन तयार ...

DRDO Recruitment 2020: Junior Research Fellowship साठी थेट ...

DRDO Recruitment 2020: Junior Research Fellowship साठी थेट भरती
डीआरडीओ भरती 2020: DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मध्ये ज्युनिअर ...

कमी वेळात मेंदूला आराम देण्यासाठी उपाय

कमी वेळात मेंदूला आराम देण्यासाठी उपाय
सध्याच्या धावपळीच्या काळात माणसाचे मेंदू आणि मन कधी अडकेल कळतच नाही. मग ते कुटुंब असो, ...