सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जुलै 2024 (19:51 IST)

सराईत गुन्हेगाराच्या खुनाप्रकरणात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

crime
पुनावळे येथे समाधान हॉटेलच्या मागे रात्री पावणे नऊच्या सुमारास सराईत गुन्हेगारावर हल्ला चढवण्याची घटना घडली असून या प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
अमोल धन्ज्या गजानन गोरगले असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मयत अमोलच्या भावाने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून राष्ट्रवादीचे माजी नगर सेवक यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक झाली असून त्यात शेखर ओव्हाळ आणि अमोल यांच्यात वाद झाला त्याचा राग आरोपीने मनात धरून ठेवला आणि अमोलवर मोठ्या कोयत्याने सपासप वार केले आरोपीने अमोलच्या पाठीवर डोक्यात वर केले त्यात अमोल गंभीर जखमी झाला.

त्याला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचाराधीन अमोलचा मृत्यू झाला. अमोल हा माजी नगरसेवक शेखर ओव्हाळच्या हत्येच्या कट रचल्या प्रकरणात तुरुंगात होता. काही दिवसांपूर्वी त्याला जामीन देण्यात आले असून तो तुरुंगातून बाहेर आला आणि त्याचा शेखर यांनी खून केला. या प्रकरणात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा पुढील तपास रावेत पोलीस करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit