पुणे जिल्ह्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नवजात बालकांचे मृतदेह आढळले
पुण्याच्या दौंड शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बोरावकेनगर परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सहा ते सात नवजात बालकांचे मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली.बाळांचे अवयव प्लॅस्टिकच्या जार मध्ये भरून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकण्यात आले .
या घटनेनंतर दौंड शहर आणि परिसरात खळबळ उडाली असून नवजात बाळे कोणत्या रुग्णालयातून फेकण्यात आली पोलीस याचा तपास करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी दौंड शहराजवळील बोरावकेनगरमधील प्राईम टाऊनच्या मागे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नवजात बाळांचे मृतदेह आणि अवयव एका प्लॅस्टिकच्या बरणीत आढळले.
पोलिसांना माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोहोचले आणि तपासणी केल्यावर बाळांचे मृतदेह आढळले.वैद्यकीय पथक देखील घटनास्थळी पोहोचले आणि बाळांची तपासणी केली. मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून हे मृतदेह कुठून इथे आले याचा तपास पोलीस करत आहे.
Edited By - PriyaDixit