डॉक्टरांना ब्लॅकमेल करत खंडणी उकळणाऱ्या सराईत महिलेसह दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

Last Modified शुक्रवार, 5 मार्च 2021 (16:21 IST)
पुण्यात शहर आणि जिल्ह्यातील डॉक्टरांना ब्लॅकमेल करत खंडणी उकळणाऱ्या मोक्काच्या गुन्ह्यात गेल्या 10 महिन्यापासून फरार असलेल्या सराईत महिलेसह दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. रंजना तानाजी वणवे (वय ३८) व सागर दत्तात्रय राउत (वय २४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. रंजना वणवे सराईत गुन्हेगार आहे. तिने खंडणी उकळण्यासाठी स्वतंत्र टोळी तयार केली होती. ही टोळी शहर व ग्रामीण भागातल्या प्रतिष्ठीत डॉक्टरांना लक्ष्य करीत होती. त्यानंतर डॉक्टरांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्याचे काम करीत होते. असाच प्रकार हडपसर परिसरातील डॉक्टरसोबत घडला होता. या प्रकरणी महिलेसह तिच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तिच्यावर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान या महिलेवर सोलापूर शहर पोलिसांनी देखील मोक्कानुसार कारवाई केली होती. मात्र, जामिनावर सुटल्यानंतर तिने पुन्हा डॉक्टरांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्यास सुरूवात केली होती. ती सोलापूरनंतर पुणे व जिल्ह्यात गुन्हे केले आहेत. त्यामुळे तिच्यावर कारवाई केली. मात्र, त्यांनतर रंजना साथीदारासह फरार झाली होती. ती फलटणमध्ये लपून बसल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने दोघांना अटक केली.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

ऑक्सिजन गळतीची दुर्घटना दुर्दैवी; मृत्युमुखी पडलेल्या ...

ऑक्सिजन गळतीची दुर्घटना दुर्दैवी; मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना: अजित पवार
नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची ...

कोविड -19 लसांच्या आतापर्यंत दिलेल्या डोसांपैकी 90 टक्के ...

कोविड -19 लसांच्या आतापर्यंत दिलेल्या डोसांपैकी 90  टक्के डोस कोविशील्डच्या आहेत
देशातील कोविड -19च्या 13 कोटी लसांपैकी 90 टक्के लस ऑक्सफोर्ड / अॅलस्ट्रॅजेनेकाच्या ...

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांचा मृत्यू

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांचा मृत्यू
नाशिकच्या झाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झालाय. अशी ...

कोरोनाचा थैमान, 3 लाख नवीन प्रकरणे, या 8 राज्यांमध्ये ...

कोरोनाचा थैमान, 3 लाख नवीन प्रकरणे, या 8 राज्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू
देशात कोरोना व्हायरस संसर्गाचे सुमारे तीन लाख नवीन प्रकरणे समोर आल्याने एकूण संक्रमित ...

रामनवमी : हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला? हनुमानाच्या ...

रामनवमी : हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला? हनुमानाच्या जन्मस्थळावरून वाद का?
हनुमान या हिंदू देवतेचा जन्म अंजनाद्री पर्वतात झाला, असा दावा तिरुमला तिरुपती देवस्थानने ...